Coffee with Sakal:भीती सोडा आणि लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करा - आयुक्त बलकवडे |Kolhapur|Sakal Media<br />kolhapur - कोरोना महामारीच्या coronavirus काळामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेला (KMC) कोरोना चाचण्यांच्या बाबतीत कोणतेही टारगेट नव्हते. तरीदेखील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कोरोना चाचण्या आवश्यकच आहेत. जादा चाचण्यामुळेच मृत्यूचा दर आणि पॉझिटिव्हिटी रेट देखील कमी होत आहे. महापालिकेने राबविलेल्या संजीवनी अभियानामुळे धोक्यात असणाऱ्या 728 व्याधीग्रस् नागरिकांचे प्राण वाचले, तर त्या कुटुंबातील सुमारे अडीच हजाराहून आधिक नागरिक कोरोना होण्यापासून बचावले. हे महापालिका राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे यश आहे. त्यामुळे भीती सोडा आणि लक्षण दिसताच कोरोना चाचणी करा,असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे (Dr.Kadambari Balkawde)यांनी सकाळ मध्ये आयोजित केलेल्या कॉफी विथ सकाळ (Coffee with Sakal) या कार्यक्रमात दिली. स्वागत निवासी संपादक निखिल पंडितराव यानी केले.सकाळचे संचालक संपादक श्रीराम पवार यांनी कॉफी विथ सकाळ या कार्यक्रमाविषयीची भुमिका सांगीतली. <br />(बातमीदार - डॅनियल काळे ) (व्हिडीओ - बी. डी. चेचर)<br />#Kolhapur #CoffeewithSakal #KMC #KadambariBalkawde #Coronavirus #Coronatest<br />